सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
किसनवीर सहकारि साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज ११५ अर्ज दाखल झाले असुन आज अखेर एकुण १२४ अर्ज दाखल झाले आहे.
आज गुरुवार दि. ३१ मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने आज अनेक दिग्गजांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. वाई, खंडाळा, जावली, सातारा व कोरेगाव अशा पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग वाजले असून दिनांक २८ रोजी ३४, दि. २९ रोजी ५९ तर दि. ३० रोजी १४६ अर्जांची अशी एकूण २३९ अर्जांची विक्री झाली आहे. आज कवठे-खंडाळा गटातून १०, भुईंज गटातून २४ अर्ज, वाई बावधन जावली गटातून ११ अर्ज, सातारा गटातून २२ अर्ज, कोरेगाव गटातून ३० अर्ज, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ ७ अर्ज, महिला राखीव मधून ५, ईतर मागास प्रवर्गातून ४, विशेष मागास प्रवर्गातून २ असे एकूण ११५ अर्ज प्राप्त झाले आहेत तर काल ९ अर्ज दाखल झाले होते. असे एकुण १२४ अर्ज दाखन झाले आहेत. उत्पादक संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटातुन एकही अर्ज दाखल झाला नाही.
अर्जाची छाननी ४ एप्रिल रोजी तर चिन्हवाटप ५ एप्रिल रोजी होणार असून गरज पडल्यास ३ मे रोजी मतदान होणार आहे. तर ५ मे रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे दीडशे मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणपत खामकर यांनी दिली आहे.