सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वाई -मेणवली रस्त्यावरील राजयोग कृषी पर्यटन हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना रविवारी रिव्हॉल्वरसह वाई पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने फिल्मीस्टाईलने धाड टाकून रंगेहाथ पकडले होते. एक तडीपार गुंड पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. पोलिस तपासात या टोळीचा म्होरक्या तडीपार सचिन येवले हा असल्याचे स्पष्ट झाल्याने वाई पोलिसांनी त्याला मुख्य आरोपी केले असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सांगितले.अटक पाच ही गुन्हेगारांवर सातारा व इतर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान रिव्हॉल्वरचा वापर घातपात करण्यासाठी होणार होता की ? अन्य गुन्हा करण्यासाठी ? यादिशेन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाई - मेणवली रस्त्यावर राजयोग कृषी पर्यटन या हॉटेलमध्ये सहा सराईत गुन्हेगार पार्टीसाठी आले असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ त्यांनी डी बी पथकाला याबाबतच्या सूचना देऊन सर्वाना ताब्यात घेण्याच्या आदेश दिले होते.
डीबी पथकाने फिल्मीस्टाईल राजयोग हॉटेलवर धाड टाकली यावेळी त्याठिकाणी साहिल सय्याज इनामदार वय वर्ष 22 रा सातारा , राहुल अण्णासाहेब कदम वय वर्ष 28 रा खोजेवाडी ता सातारा ,महेंद्र लक्ष्मण गायकवाड वय वर्ष 28 ,सागर अनिल पडवळ वय वर्ष 27 रा शेंद्रे, सादिक अय्याज बागवान वय वर्ष 17 रा गुरुवारपेठ सातारा यां पाच आरोपींना ताब्यात घेतले. परंतु यादरम्यान सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षासाठी तडीपार असलेला सागर संदीप साबळे वय वर्ष 26 हा गुंड पळून जाण्यात यशस्वी झाला त्याला पकडण्यासाठी वाई पोलिसांनी रविवारी रात्री सर्वत्र नाकेबंदी करून पोलीस पथके रवाना केली मात्र अद्याप तो अजून मिळून आला नाही.
सोमवारी पोलिसांनी अटक पाच जणांकडे कसून चौकशी केली यामध्ये आम्हीं सर्व हॉटेल मालक सचिन येवले यांच्या कडे आलो असल्याचे सांगितले. येवले हा ही जिल्ह्यातून तडीपार आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच सहाजण वाईत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रक्रियेत येवले हाच सूत्रधार असल्याने पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात मुख्य आरोपी केला असून लवकरच त्यांच्या ही मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस निरीक्षक भरणे यांनी सांगितले. तडीपार साबळे याला ही लवकरच गजाआड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेला साहिल याच्यावर तीन, साबळे यांच्यावर सात, येवले याच्यावर चार व इतरांवर प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून सर्वजण सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले त्यामुळे वाई तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या धाडसी कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,व त्याच्या टीमचे कौतुक होत आहे.