वाई ! विरमाडेत शॉर्टसर्कीटमुळे अडीच एकर ऊसजळुन खाक : सुमारे ३ लाखाचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी  
विरमाडे ता.वाई येथील शिवारात दि.३ मार्च रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अचानक पणे उसाच्या ऊंचीवर विद्युत तारा लोंबकळत आहेत त्या मध्ये  शॉर्टसर्कीट होऊन 
त्याच्या ठिणग्या ऊसात पडल्याने उसाच्या क्षेत्रातील  वाळक्या पाचटीने जलद पेट घेतल्याने बघता बघता क्षणार्धात  आडीच एकर ऊस शेतकर्यांच्या साक्षीने जळुन खाक झाला त्या मुळे शेतकर्यांचे अंदाजे ३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने  विरमाडे गावात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे .
              भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विरमाडे ता.वाई येथील मळा नावाच्या शिवारात गट नं.२८३ चा ३. २८३ चा ४ असे नंबर असुन त्यात विशाल अशोक  सोनावणे आणी लगत असणारे पंडीत दत्तात्रय सोनावणे या दोघांचेही तोडण्यासाठी आलेले ऊसाचे ऊभे पीक आहे त्यांचे क्षेत्रावरुन अंदाजे १० फुट ऊंची वरुन विध्दुत वितरण  मंडळाच्या विज वाहक तारा गेलेल्या आहेत गुरुवार दि.३ रोजी  दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास तक्रारदार विशाल सोनावणे हे घरी असताना दिपक सोनावणे यांनी मोबाईलवर फोन करुन सांगितले की तुमच्या उसाला आग लागली आहे असे  समजताच गावातील विनोद सोनावणे बाजीराव जगदाळे सचिन सोनावणे व इतर लोकांना सोबत घेऊन आग लागलेल्या उसाच्या घटना स्थळावर पोहचलो तेथे पाहिले  असता पंडीत सोनावणे यांच्या क्षेत्रातुन गेलेल्या विध्दुत तारा मधुन शॉट सर्किट होऊन त्याच्यातुन ठिणग्या पडुन त्यांचे व त्यांच्या लगत असणारे माझे असे आडीच  एकर क्षेत्रातील अंदाजे  २०० टन  ऊसाचे क्षेत्र जळुन खाक झाले आहे त्याच बरोबर ऊसाचे क्षेत्र भिजविण्यासाठी केलेली ठिबक सिंचन पाईप लाईन जळुन खाक झाली आहे असे मिळुन एकुण ३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार ऊसाचे मालक असलेले विशाल अशोक सोनावणे वय ३० वर्ष  राहणार विरमाडे ता. वाई यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे त्यात त्यांनी जळीत झालेल्या ऊसाची सखोल चौकशीची मागणी केली आहे .याचा अधिक तपास सपोनि आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली भुंईज पोलिस करीत आहेत .
To Top