बारामती पश्चिम ! सुपे येथे पोलिस पाटील पदग्रहण सोहळा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालूका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी सायंबाचीवाडी गावचे पोलिस पाटील गोविंदराव जगताप यांची  तर उपाध्यक्षपदी मळद येथील पोलिस पाटील अविनाश आटोळे यांचीआज बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष  बाळासाहेब शिंदे पाटील, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक  सलीम शेख  यांच्या हस्ते नियूक्ती पत्र देऊन  निवड करण्यात आली. 
           यावेळी प: महाराष्ट महीला पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर यांच्या वतीने सर्व महिला पोलिस पाटील यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ट्राॅपी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी  गणेश इंगळे यांनी सर्व पोलीस पाटील यांना पोलीस पाटील पदाचे महत्त्व आणी त्यांचे कार्य याबद्दल अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले यावेळी पोलिस पाटील संघटनेचे पुणे जिल्ह्यातील सर्व तालूक्यातील अध्यक्ष,उप अध्यक्ष तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा पोलिस पाटील संघाचे प्रसिद्धी प्रमुख जयसिंग भंडारी पाटील यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार बारामती तालूका पोलिस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष राहूल बोरकर यांनी केले
To Top