बारामती ! बाबुर्डी येथे विस लाख रुपये किंमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सुपे : प्रतिनिधी
बाबूर्डी येथील लव्हेवस्तीवरील स्मशानभूमी रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून आज या रस्त्याचे भूमीपूजन जेष्ठ ग्रामस्थ जयवंत लव्हे यांच्या शुभहस्ते पार पडले. 
        नुकतेच लव्हेवस्तीवरील दहा लाख रुपये किंमतीच्या स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून स्मशानभूमीकडे जाण्याऱ्या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या माध्यमातून वीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. आज या रोडच्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच अँड. दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्या सौ.मंगल लव्हे, सौ. मनिषा बाचकर, दत्तात्रय ढोपरे तसेच माजी सरपंच शिवाजीराव लव्हे, सुनिल जगताप, राजकुमार लव्हे, अशोक लव्हे, सोनबा लव्हे, रामभाऊ लव्हे, गोविंद बाचकर, लक्ष्मण पोमणे, सागर लव्हे, रूषिकेश लव्हे तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
To Top