सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या असलेल्या पेट्रोल पंपावर रोज शेकडो पुरुषांनी लघुशंकेचा अड्डाच बनवला होता. त्यामुळे अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कारखान्याच्या वतीने पेट्रोल पंपावर तीन मुताऱ्या बांधण्यात आल्या मात्र म्हणतात ना..... जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही..! असचस काही मुताऱ्या बांधून पण लोकांची इकडे तिकडे लघु शंका करण्याची सवय काय जात नव्हती.
मंग पेट्रोल पंपावरील अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी एक शक्कल लढवली. मुतारी सोडून इकडे तिकडे लघु शंका करणाऱ्यांवर वॊच ठेवण्यासाठी cctv कॅमेराच् बसवले आणि त्याठिकानी बोर्ड लावला की कृपया भिंतीवर लघुशंका करणाऱ्यांनो जर इकडे तिकडे लघुशंका केली तर लघु शंका करतानाचे आपले फोटो व्हाट्स अप वर टाकले जातील..आणि त्या अधिकाऱ्याची आयडिया कामाला आली होती आणि नको तिथे लघुशंका करणाऱ्यांनी फोटोची धास्ती घेतली होती. इतर नागरिकांचा त्रास कमी झाला होता.