बिग ब्रेकिंग ! बारामतीतील रस्त्यासाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय : ७७८ कोटींचा निधी मंजूर

Pune Reporter
बारामती दि २०

चांगल्या प्रतीचे व उत्तम दर्जाचे रस्ते तयार करणारे म्हणून जगभरात प्रसिध्द असलेले  केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी  महाराष्ट्रातील २१०० कोटींहून जास्तीचा  निधी रस्ते कामाला मंजूर दिली आहे. या संदर्भात गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या रस्त्यांमध्ये  बारामती सह राज्यातील इतर जिल्ह्यांतील महामार्गाचा समावेश आहे.

गडकरी यांनी एका पाठोपाठ एक असे ट्वीट करत महाराष्ट्रातील कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी देण्यात आली आहे, या संदर्भात माहिती दिली आहे. यातच महाराष्ट्रातील एनएच-१६० च्या उंडेवाडी कडे पठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण या ३३.६५ किमी रस्त्याचे ४- लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी ७७८.१८ कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. 
To Top