खंडाळा ! खंबाटकी घाटात एक लांबलचक ट्रक बंद पडतो तेंव्हा...! पाच किलोमीटर रांगाने खंबाटकी घाट झाला ब्लॉक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
 पुणे सातारा या महामार्गावर असणार्या खंबाटकी घाटात घाट रस्ता चढत असतानाच  दत्त मंदीर परिसरात एक बलाढ्य लांब लचक ट्रॉली घेऊन जाणारा मालट्रक अचानक पणे बंद पडल्याने घाटातील वाहतुक काही काळ बंद पडली त्या मुळे वाहनांच्या अंदाजे चार ते पाच किलो मीटर पर्यंत लांबच लांब लागलेल्या रांगांची माहिती खंडाळा पोलिसांना समजताच  हि वाहतुक कोंडी फोडण्या साठी ते घाटात दाखल झाले परस्थितीची पाहणी केली असता बंद पडलेला मालट्रक ट्रॉली सह बाजुला काढण्या साठी अपेक्षित क्रेन सातारा जिल्ह्यात.ऊपलब्ध होत नसल्याने खंडाळा पोलिसांनी सातारा पुणे महामार्गावर असणार्या खंबाटकी बोगद्यातुन सातारा दिशेकडे जाण्या साठी वाहनांची  एकेरी वाहतुक सुरु करुन वाहनांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच दुर्दैवाने या बोगद्यातच एक मालट्रक अचानक पणे बंद पडल्याने बोगद्यातुन सुरळीत पणे सुरु 
असलेली वाहतुकही बंद पडल्याने वेळे गावा पासूनच सुरूर पर्यंत अशा पाच किलो मिटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी सकाळ पासूनच झाल्याने याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे आणी जोशी विहीर येथील महामार्ग पोलिसांना समजताच दोन्हीही .विभागाचे पोलिस कर्मचारी वेळे येथील बोगद्यात दाखल झाले पण वाहनांच्या लांबच लांब रांगा बघून पोलिसही हतबल झाल्याचे दिसुन येत होते .होळीच्या सणा निमित्त मुंबई पुणे येथील चाकरमानी सातारा आणी कोल्हापुर येथील आप आपल्या घरा कडे आले 
होते ते आज सुट्टी दिवस संपवून पुन्हा मुंबई पुण्याकडे आपल्या कुंटुंबा समवेत आप आपल्या चार चाकी दुचाकी वाहनांन मधुन जात असताना अशी वाहतुक कोंडी झाल्याने तब्बल पाच ते सहा तास या प्रवाशांना कडक ऊन्हात ताटकळत बसावे लागल्याने त्यांचे हाल झाल्याने  प्रवाशांनमध्ये संतापाची लाट उसळली होती .महामार्ग पोलिसांच्या गलथान कारभारा मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असा आरोप वाहन चालकांनी केला आहे तर सातारा पुणे आणी पुणे सातारा या दिशेने जाणार्या वाहन चालकांनी  बेशिस्त पणे वाहने चालवून वाहतुक कोंडी निर्माण केली असल्याचा आरोप 
केला आहे ..
To Top