सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की ओझर्डे ता.वाई गावच्या हद्दीतील टाकुबाईचा माळ परिसरात कवठे येथील विध्दुत मंडळाचे शाखाधीकारी यांच्या गलथान कारभारा मुळे उसाच्या फडात हाताला लागतील एवढ्या अंतरावर लोंबकळत असलेल्या विज वाहक तारांन मध्ये शॉकसर्कीट होऊन त्याच्या ठिणग्या उसाच्या फडात पडल्याने दत्तात्रय पिसाळ यांचा सव्वा एकर. बबन गणपत बामणे अर्जुन भाऊ बामणे ज्ञानेश्वर भाऊ बामणे या शेतकर्यांचे साडेचार एकर २०० टन ऊस तोडणीच्या उंबरठ्यावर ऊभा असतानाच जळुन खाक झाल्याने प्रत्येक शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने
विध्दुत मंडळाच्या या गलथान कारभाराचा फटका शेतकर्यांना बसल्याने शेतकर्यांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ओझर्डे गावातच माळ नावाच्या शिवारात अरविंद फरांदे आणी आनंदा फरांदे या दोघांच्या तोडणीच्या प्रतिक्षेत असणार्या ऊसाच्या आडीच एकर फडाला अचानक पणे
लागलेल्या आगीत जळुन खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .तर ओझर्डे येथील शिवची पदमावती परिसराच्या ऊत्तर दिशेला असणारे कल्याण शिवराम जाधव .राजाराम किसन जाधव .संग्राम चंद्रकांत जाधव .अशोक रामचंद्र जाधव .अरविंद काशीनाथ जाधव या शेतकर्यांचा साडेचार एकर ऊस तोडणीच्या उंबरठ्यावर ऊभा होता त्यास अचानक आग लागल्याने तो जळुन खाक झाल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .
वाई तालुक्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना हा आर्थिक संकटात सापडल्याने तो या वर्षी गळीता साठी बंद असल्याने ऊस कुठल्या कारखान्यात गळीता साठी पाठवायचा अशा चिंतेचे वातावरण हजारो शेतकर्यांन समोर
आहे.