सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महिला दिनाचे औचित्य साधून दि.१९ मार्च २०२२ रोजी सोमेश्वर मंदिर येथील सभागृहात महिला दिन व राष्ट्रवादी महिला गाव कमीटी तयार करण्याबाबत प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर व जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे यांच्या सुचनेवरुन महिला अध्यक्ष वनिता बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा करण्याच्या दृष्टीने सुचिता जगन्नाथ साळवे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस आणि अन्न पुरवठा वितरण व्यवस्थापण समिती सदस्या यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती तालुकाराष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ.वनिता बनकर होत्या यावेळी त्यांनी गाव कमीटी तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले या प्रसंगी सहा गावाच्या गाव कमिटया तयार करण्यात आल्या सदर कमिटयांच्या महिला अध्यक्षांची निवड करून अध्यक्ष कमिटीतील सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा दिल्या. महिलांना महिला बचतगटासंबंधीची संपूर्ण माहिती .मनिषा रासकर यानी दिली.तर उद्योजिका.वृशाली घाडगे यांनी महिलांना उद्योग व्यावसाया विषयी माहिती दिली आपले व्यवसायाचे अनुभव सांगून सर्व उपस्थित महिलांना व्यवसाया विषयी प्रेरणा दिली या कार्यक्रमासाठी करंजे,करंजेपूल, चौधरवाडी, माळवाडी, वाघळवाडी, मुरुम, वाणेवाडी, देऊळवाडी येथील ९५ महिला उपस्थित होत्या अशा प्रकारचा कार्यक्रम घेतल्यामुळे सर्व महिलांनी आनंद व्यक्त केला आशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याची विनंती.सुचिता साळवे यांना सर्व महिलांनी केली. या कार्यक्रमाला बारामती तालुका सभापती निताताई फरांदे, करंजे गावच्या विद्यमान सरपंच गायकवाड ताई,सं.गां.स नुसरत इनामदार,दिपाली पवार, कुटेताई, आनिता भांडवलकर,मालन सावंत, माधुरी सावंत, प्रतिक्षा झणझणे ,भाग्यश्री सकुंडे,राणी गायकवाड तसेच परीसरातील महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक.सुचिता साळवे यांनी केले तर आभार सरपंच जया गायकवाड यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिलांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले असे .सुचिता साळवे यांनी सांगितले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर देवस्थानचे सचिव राहूल भांडवलकर, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे आणि करंजे गावचे उपसरपंच शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.