भोर ! 'या' कारणामुळे भोर शहरातील रस्ते सुनसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पावसाळ्यात अतिवृष्टी, हिवाळ्यात अतिथंडी तर उन्हाळा सुरू झाल्याने सुरुवातीच्या महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागल्याने भोर तालुक्यात उन्हाच्या पाऱ्याचा टक्का वाढत चालल्याचे चित्र आहे.अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असले तरी वाढत्या उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले असून दिवसा घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.
                 दरवर्षी उन्हाळ्याच्या पहिल्या व दुसऱ्या महिन्यात ऊन कमी प्रमानात असते मात्र यंदा उन्हाळ्याला एक महिना पूर्ण होताच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे.तालुक्यात सद्या रब्बीतील ज्वारी,गहू,हरभरा पिकांची कापणी सुरू आहे.मात्र उन्हाच्या चटक्याने पिकांच्या कापणीचे काम वेळेत होत नसल्याने तसेच पिके वाळून चालल्याने नागरिक हैराण झाले आहेत.तर शहरातील नागरिक कडक उन्हामुळे घराबाहेर पडणे पसंत करीत नसल्याने बाजार पेठेत शुकशुकाट असून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.तालुक्यात कडक उन्हाळा जाणवू लागला असला तरी सद्या सर्वत्र ग्रामीण भागासह शहरात पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध आहे.
To Top