सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
सुमतीताई गोरे ट्रस्टच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार राज्य मॉडेल स्कूल' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-उत्रौली ता. भोर येथील उपक्रमशील शिक्षक विठ्ठल दानवले यांना नुकताच सन्मानपूर्वक पुणे येथे प्रदान करण्यात आला.
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. राज्यातील 20 शिक्षकांची निवड समितीद्वारे पडताळणी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे या पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
स्वतःतील गुणवत्तावाढ, सामाजिक व शैक्षणिक कार्यातील वेगळेपणा, साहित्यिक सहभाग, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील वेगळे उपक्रमशील प्रयोग आणि प्रयत्न ,कोरणा काळात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या निकषांच्या आधारे दानवले यांना हा राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्कार जाहीर झाला आहे.
निवडीबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, गटशिक्षणाधिकार अश्विनी सोनवणे/ केळकर केंद्रप्रमुख अंजना वाडकर दानवले यांचे अभिनंदन होत आहे.