सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार


            पुणेदि. १३

 पुणे शहरपिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून पुण्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली  जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

            पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरआमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री पवार म्हणालेसर्वसामान्य नागरिक केंदबिंदू मानून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषीसार्वजनिक आरोग्यमुनष्यबळ विकासदळणवळण आणि उद्योग या पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करुन मानवी जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात राज्यासह पुण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

            केंद्र सरकारराज्य सरकार आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने रुग्णालयांची उभारणी करण्यात येत असून या रुग्णालयांच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधामध्ये गुणवत्तापूर्ण भर पडण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिेकांना परवडणाऱ्या दरात घरेआरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यात येणार आहे. विकासकामे करताना ती उत्तम दर्जाची व्हावीत आणि त्यात पारदर्शकता असावी असा प्रयत्न आहे.

            सुशिक्षित युवक-युवतींच्या कौशल्यात वाढ करुन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रत्येक महसुली विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडीवनाझ ते चांदणी चौकरामवाडी ते वाघोलीस्वारगेट ते हडपसरहडपसर ते खराडीखडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

            स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे त्यांचं स्मारक वढु बुद्रुक व तुळापूर परिसरात उभारण्यासाठी २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रिंगरोड ,मेट्रोरस्तेहवाई वाहतूकीचे जाळे उभे करुन वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. इंधनाची बचत व्हावी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्यात येणार आहे.  शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

            जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळेविरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळनगरसेवक दत्तात्रय धनकवडेबाबूराव चांदेरेहाजी अब्दुल गफूर पठाणप्रकाश कदमनगरसेविका परवीन शेख आदी उपस्थित होते.

विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सूस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामाचेवारजे माळवाडी येथील क्रीडा संकुल व क्लब हाऊसचेशिवणे येथील शिवणे-नांदेड पूलसुखसागर नगर येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम क्रीडा संकुलपोलीस चौकीराजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय महिला बचत गट सभागृहकै. किसनराव कदम उद्यानमहादेवनगर येथील ७० लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची टाकीचेमिठानगरकोंढवा खुर्द येथे माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहहजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटसह विविध विकास कामांचे लोकार्पणउद्धाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार
https://lh3.googleusercontent.com/-Vd_YQY_WU04/Yi3qtQBrxII/AAAAAAAAE84/kOijL5oEim83H7bxBtLr3FpRaXV-Xb_mQCNcBGAsYHQ/s1600/1647176369107650-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Vd_YQY_WU04/Yi3qtQBrxII/AAAAAAAAE84/kOijL5oEim83H7bxBtLr3FpRaXV-Xb_mQCNcBGAsYHQ/s72-c/1647176369107650-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/03/blog-post_904.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/03/blog-post_904.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy