सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या मेढा नगरपंचायतच्या विविध विषयाच्या सभापती निवडी मधे आरोग्य,स्वच्छता व वैद्यकिय विषयक,शिक्षण समितीच्या सभापती पदी विकास देशपांडे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल श्री वेण्णा विद्या मंदीर व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने श्री विकास देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कार करताना प्राचार्या सौ.निलम पाटील मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सचिन करंजेकर,प्रा.पी.बी.पाटील सर,पर्यवेक्षक श्री चंद्रकांत शिंदे सर आणि सर्व सन्माननीय शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य निलम पाटिल म्हणाल्या, विकास देशपांडे नेहमी विद्यालयाच्या साठी मदत करीत असतात त्यांच्या सहकार्याने विद्यालयात अनेक बदल झाले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेतच विकास देशपांडे हे श्री वेण्णा विद्या मंदीर व ज्युनिअर च्या स्थानिक सल्लागार कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या निवडी चे विद्यालयाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.