सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ज्योतिबा वि का सोसायटी मळशी (वाणेवाडी) या संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.
सदर निवडणुक बिनविरोध पार पडली असून निवडणूक अधिकारी सुनील काळे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था बारामती यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सर्व सभासदांनी सहकारी केले म्हणून म्हणून संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.
नवीन निवडून आलेले संचालक खालील प्रमाणे दत्तात्रेय भगवान जगताप, शहाजी ज्योतीराम जगताप, लक्ष्मण बळवंत काकडे, प्रवीण वसंतराव जगताप, धन्यकुमार संपतराव जगताप, रविराज तानाजीराव जगताप, संकेत दिलीप जगताप, शशांक दिलीप जगताप, विमल अभिमन्यु जगताप, मीना धन्यकुमार जगताप
ज्योतिबा सोसायटीची स्थापना २५ वर्षांपूर्वीची असून या संस्थेची सभासद संख्या १४२ आहे. आजपर्यंत या संस्थेची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. संस्था दरवर्षी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करत असते. तसेच वेळोवेळी भेटवस्तू देखील देत असते. संस्थेने आजअखेर २ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असल्याची माहिती सचिव धन्यकुमार जगताप यांनी दिली.
COMMENTS