सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे दि. १७ ( वार्ताहर )
बारामती तालुक्यातील कुतवळवाडी गावठाणमध्ये सुमारे ८४ लाख खर्चाच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुतवळवाडी स्मशानभूमी रास्ता १५ लाख, पाटील वस्ती रस्ता १५ लाख, जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता दहा लाख, कुतवळवाडी गावठाण वीस लाख, ड्रेनेज चार लाख आदी सुमारे ८४ लाख खर्चाच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे होणार आहेत.
याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती निता बारवकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तात्रेय कुतवळ आदीसह सरपंच शिवाजी सकट, उपसरपंच सारिका बोरकर, माजी उपसरपंच दत्तात्रय कदम, संतोष बोरकर, माधवी भोसले, शकुंतला कुतवळ, महानवर महेंद्र कुतवळ, मुरलीधर कुतवळ, संपत कुतवळ, राजेंद्र मचाले, सुरेश कुतवळ विजय कुतवळ, प्रसाद कुतवळ, प्रकाश बोरकर रमेश बोरकर, भाऊसाहेब भोसले तसेच कुतवळवाडी बोरकरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.