बारामती पश्चिम ! आदिनाथ गायकवाड यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

Admin
4 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा संचालित शैक्षणिक वर्षे २०२०-२१ इ. दहावी व इ. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पुरस्कार वितरण सोहळा नटसम्राट निळू फुले रंग मंदिर नवी सांगवी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समितीच्या वतीने व परमपूज्य सद्गुरु माऊली महाराज वाळुंजकर यांच्या शुभहस्ते विद्यार्थी पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष श्री कल्याण रावजी दळे साहेब उपस्थित होते. समितीच्यावतीने श्री ज्ञानेश्वर बबनराव पांडे यांना" समाजभूषण पुरस्कार देण्यात आला, तसेच युवा शास्त्रज्ञ कुमार सोहम पंडित याला १०० अंतराळातील ग्रह बनवल्याबद्दल गिनीज बुक मध्ये नोंद झालेला "युवा शास्त्रज्ञ"गौरव पुरस्कार अभिनेत्री कु. ज्ञानेश्वरी दत्तात्रय गायकवाड "कलाक्षेत्रातील गौरव पुरस्कार व श्री आदिनाथ गायकवाड व श्री प्रकाश सोलापूरकर यांना "आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले. समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री रमेशजी राऊत, महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ अनिता ताई अशोक मगर, बारा बलुतेदार महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सोमनाथ शेळके, प्राचार्य प्रदीप कदम (शिवव्याख्याते ) माजी नगरसेवक सतीश दादा दरेकर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर उपाध्यक्ष श्री अरुण शेठ ढमाले उपसरपंच नेरे, कार्यक्रम समन्वयक श्री अशोक मगर कंसात (आयोजक) श्री सुनील वाळुंज, श्री मंगेश पांडे (संपादक ) श्री प्राध्यापक दत्ता गायकवाड, श्री संतोष रसाळ (सरपंच) श्री भाऊसाहेब यादव, श्री दत्तात्रय वाळुंजकर, अंकुश जाधव, श्री हेमंत भालेकर, श्री नितीन कुठे, श्री नितीन सुरवसे, श्री गणेश राऊत, खेड तालुका महिला अध्यक्ष सौ कविता ताई वाकुंज व पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ सुवर्णा ताई वाकुंजकर या समिती सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री तानाजी वाळुंजकर, कु अंकिता मगर कु. प्राजक्ता मगर, चि. सिद्धेश वाकुंजकर यांनी केले इ. दहावी मध्ये सर्वात जास्त गुण 99.7 % प्राप्त केलेली विद्यार्थिनी कु. पूर्वा मनोज जाधव इ. बारावी मध्ये 95.16% गुण प्राप्त केलेली कु. संस्कृती संजय तावरे यांनी परमपूज्य सद्गुरु माऊली नाथ महाराज वाळुंजकर यांच्याकडून प्रत्येकी" पाच हजार रुपये "रोख पारितोषिक देण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांचे वंशज श्री प्रकाश तिरल पुरकर यांना आदर्श कार्यकर्ता गौरव
"पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री कल्याणराव दळे बोलत होते "ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणावर दगा येणार आणि शासन या समाजाला धोका देणार हे निश्चित होते आणि हे झालं सुद्धा त्याचप्रमाणे "ओबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या सर्व पालकांनी या गोष्टीची दखल घ्यावी की ज्याप्रमाणे ओबीसी आरक्षणात धोका दिला त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात ओबीसीच्या शैक्षणिक आरक्षणावर दगा आणण्याचा प्रयत्न जर झाला तर फार मोठे नुकसान ओबीसी समाजाचे होईल एक प्रकारे षड्यंत्र ओबीसी समाजाच्या विरोधात येत आहे आणि या षडयंत्रला आपण समजून घेतले पाहिजेत व त्यापासून बचाव करण्यासाठी कार्यरत असले पाहिजे, याप्रसंगी प्राचार्य प्रदीप कदम व्याख्याते यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःची कला कौशल्य अंगभूत गुण ओळखून आणि समाजाला गरज असणाऱ्या गोष्टींची जाणीव ठेवून क्षेत्र निवडले तर यश निश्चित मिळते, आधुनिक काळामध्ये योग्य साधनांचा किंवा माध्यमांचा वापर करून त्याला कष्ट जिद्द व अभ्यासाची जोड दिली तर योग्य दिशेने पाऊल पडते स्वतःबरोबर कुटुंबाचा समाजाचा व राष्ट्राचा विकासाचा विचार करून मार्गक्रमण केले तर तो खरा आदर्श नागरिक" असे प्रतिपादन प्राचार्य प्रदीप कदम यांनी प्रतिपादन केले कमी वेळामध्ये 100 उपग्रह बनविणे गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद असलेला अत्यंत लहान वयात छोटासा शास्त्रज्ञ सोहम पंडित सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.
To Top