बारामती पश्चिम ! एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 बारामती तालुक्यातील एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल येथे दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व ,केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली अशा महान विचारक समाजसुधारक लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
         जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली इयत्ता ६वी तील विद्यार्थ्यांनी जोतिबांच्या जीवनावर आधारित सुरेख नाटक सादर करून विद्यार्थ्यांची व शिक्षकांची दाद मिळवली. आसमा पठाण आणि सुजाता हंगिरे या महिला शिक्षकांच्या भाषणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागातील  . वैशाली गायकवाड व .गौरी फरांदे  यांनी केले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  किशोरी काकडे  व. अनुराधा खताळ व  शीतल पवार  यांनी भूषविले.
       या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य अजित वाघमारे, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
To Top