सुपे परगणा Big Breaking ! सुपे परिसरात शंभर एकर जागेत महिला पोलीस प्रशिक्षन केंद्र होणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : सचिन पवार
बारामती तालुक्यातील सुपे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाचे सुमारे  ४ कोटी ९० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांसमार्फत पार पडले.याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हाणाले की सुपे परिसरात सुमारे शंभर एकर जागेत महिला पोलिस प्रक्षिशन करण्यात येणार आहे तसेच फक्त सुपे गावाची सहमती असेल तर सुपे नगरपंचायत देखिल करण्यास मी तयार आहे असे उद्गार पवार यांनी यावेळी बोलताना काढले ,
           यावेळी पवार यांनी सुपे परिसरातील कृषि उत्पन्न बाजार समितीची इमारत, ग्रामीण रुग्णालय इमारत, सुपे ग्रामीण पोलीस स्टेशन, मयुरेश्वर अभयारण्य, विद्या प्रतिष्ठान संकुल इत्यादी ठिकाणी चाललेल्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामं वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या. सुपे परगण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामं करण्यात येत आहेत. सुपे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या श्रेणीत वाढ करण्याबाबत प्रस्ताव ग्रामपंचायतीनं सादर करावा.
                      सुपे गावात १०० एकर जागेत महिला पोलिसांसाठी सुविधा आणि चांगलं शैक्षणिक संकुल उभं करायचं आहे. मुलांचं- मुलींचं वसतिगृह, शिवसृष्टी इत्यादी अनेक कामं करावयाची आहेत. याबाबत संबंधित पदाधिकारी - अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत अशा सुचना केल्या , उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत आहे. विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बाहेरच्या कंपन्यांकडून वीज खरेदी करण्यात येणार आहे. नागरिकांनी वीज बिल व घर पट्टी वेळेत भरली पाहिजे तरंच चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध  होतील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करूनच ऊसाचं उत्पादन घ्यावं. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाने चालूच राहतील, याबाबत संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या हडपसर - चौफुला - सुपे व हडपसर - सासवड - जेजुरी - सुपे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आले यासाठी ग्रामपंचायत सुपे मार्फत पाठपुराकरण्यात आला होता तसेच पीएमपीएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा , झेंडे ,रूपनवर , बाळासाहेब सुपेकर ,अनिल हिरवे यांचे विशेष सहकार्य लाभले , याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस  बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , सोमेश्वर सहाकारी कारख्यान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप , मा जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बारामती दुध संघाचे चेअरमन संदीप जगताप ,बारामती बॅकेचे चेअरमन सचिन सातव, पंचायत समिती सदस्या निता बारवकर , सुपे ग्रामपंचतीच्या सरपंच स्वातीताई अनिल हिरवे , उपसरपंच मल्हारी खैरे ,युवक तालुकाध्यक्ष राहुल वाबळे, युवक तालुका उपाध्यक्ष अनिल हिरवे ,  हनुमंत शेळके , गणेश चांदगुडे ,पोपट पानसरे, शौकत कोतवाल , ग्रामपंचायत सर्व सदस्य , ग्रामस्थ , सर्व आजी माजी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते 
            यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे यांनी केले , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक लोणकर सर व सुयश जगताप व आभार ग्राविकासधिकारी दादासो लोणकर यांनी मानले,
To Top