सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
सुमारे ३२५ वर्षाची परंपरा असलेल्या भोरच्या संस्थानिकांच्या राजप्रसादाच्या दरबार सभागृहात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्री रामाचा रामजन्मोत्सव पारंपरिक पध्दतीने दुपारी १२ वाजता मोठया उत्साहात प्रभू रामाचा जयघोषात साजरा करण्यात आला. या जन्मोत्सवाला भोरचे राजे कै आबाराजे पंतसचिव यांच्या पत्नी उर्मिलादेवी,पुञ राजेश पंतसचिव,योगेश पंतसचिव,स्वातीदेवी पंतसचिव उपस्थित होते. रविवार दि-१० सकाळी ११ वाजता राजप्रसादातुन राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती व नागरिक बँड व पारंपारिक वाद्यांच्या साथीने राममुर्ती आणण्यासाठी सोनाराकडे गेले.राममुर्तीची पालखीतुन मिरवणूक काढून राजप्रसादात आणन्यात अली.यावेळी नागरिकांनी पृष्पवृष्टी केली.त्यानंतर हि मुर्ती राजप्रसादात सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली. ठिक १२ वाजता राजेशराजे पंतसचिव व त्यांच्या भावाने व मुलाने पाळण्याची दोरी ओढुन श्री रामाचा जयजयकार केला.त्यानंतर उपस्थितांनी रामाच्या पाळण्यावर पृष्पवृष्टी करुन श्री रामाच्या घोषणांनी राजप्रसादाचा दरबार सभागृह दणानुन सोडाला.
____________-_
भाविकांमध्ये जल्लोष
सव्वा तीनशे वर्षांपासून तालुक्यात सर्वात मोठी यात्रा भोरची रामनवमी भरते .मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे रामनवमीचा उत्सव बंद होता.सद्या कोरोना कमी झाल्याने ही यात्रा भरली गेली.त्यामुळे भाविकांमध्ये मोठे जल्लोषाचे वातावरण होते.