......तहानलेल्या 'मुर्टी'करांसाठी अक्षय शिंदे फाउंडेशनचा मायेचा 'घोट' : रोज ३६ हजार लिटर पाणीपुरवठा करणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने मुर्टी गावाला रोज ३६ हजार लिटरचा पाणीपुरवठा केला जाणार आहे. आज याचा शुभारंभ करण्यात आला. 
            अक्षय शिंदे फाउंडेशनने गेली पाच वर्षे पुणे जिल्हात विविध समजपयोगी कामे केली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अंगणवाड्याना गॅस वाटप, शाळकरी मुलांना सायकल वाटप, लॅपटॉप, प्राथमिक शाळेतील मुलांना टॅब वाटप, नीरा बारामती रस्त्यावर बसस्टँड, अंगणवाड्या इमारती अशी विविध कामे केली आहेत. बारामती च्या जिरायत पट्ट्यातील मुर्टी गावाला काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या झळा बसू लागल्या आहेत.
          गावाच्या पाणीपुरवठा विहिरीने तळ गाठल्याने गावाला पिण्याचे पाणी कमी पडू लागले आहे. अक्षय शिंदे फाउंडेशन दरवर्षी या गावाला पाणीपुरवठा करत असते. मुर्टी गावसह बेलबाचा मळा, भोसलेवस्ती, शिंदेवस्ती, सणासाचामळा या सर्व वाडीवस्तीवर मिळून रोज ३२ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मात्र फाउंडेशनकडून रोज ३६ हजार लिटरचा पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती अक्षय शिंदे फाउंडेशनचे आर एन शिंदे व संजय शिंदे यांनी सांगितले. 
              हे सर्व पाणी पाणीपुरवठा विहिरीत सोडले जाणार असून तेथूनच गावातील १८६ घरांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती सरपंच मंगल खोमणे व उपसरपंच किरण जगदाळे यांनी दिली. 
          आजपासून अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने मुर्टी गावाला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ट्रक चे पूजन करून ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष आर एन शिंदे, सचिव संजय शिंदे, सदस्य योगेश सोळस्कर, बाबुलाल पडवळ, संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे, प्रदीप मांगडे, मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, तानाजी राजपुरे, हरिदास जगदाळे, संभाजी चव्हाण, शिवाजी गदादे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top