वाई ! व्याजवाडी येथे एक एकर ऊस जळून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील व्याजवाडी गावचे रहिवासी असलेले अशोक पिसाळ आणी विश्वास पिसाळ या दोघांच्या शेतात गाळपाच्या आणी  तोडणीच्या अंतीम टप्प्याच्या प्रतिक्षेत उभ्या असणाऱ्या उसाला गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पणे शाॅक शर्कीट होऊन त्याच्या ठिणग्या ऊसाच्या फडात पडल्याने एक एकर ऊस जळुन खाक झाल्याने अंदाजे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .
           घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की 
व्याजवाडी ता.वाई येथील रहिवासी असलेले अशोक संपत पिसाळ यांचे दळे गावदर परिसरातील गट नं.५७ मधील २० गुंठे क्षेत्रात उभा ऊस होता तर लगतच असणारे विश्वास बंडोबा पिसाळ यांचे गट नंबर ५६ मध्ये २० गुंठे क्षेत्रात ऊसाचे ऊभे पीक होते या दोघांच्याही शेत जमीनीच्या जागेतून ऊस पिकांच्या वरुन विज वाहक तारा गेलेल्या आहेत याच तारांन मध्ये शॉकसर्कीट झाल्याने त्याच्या ठिणग्या ऊसाच्या फडात पडल्याने काही कळण्या आधीच क्षणार्धात ऊसाने पेट घेतला आणी बघता बघता आगीने रुद्ररुप धारण केले आणी एक एकर ऊसाचे पिक त्यात जळुन खाक झाले त्यामुळे वरील दोन्ही ही शेतकर्यांचे अंदाजे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाले आहेत या प्रगतीशील शेतकर्यांचे आर्थिक  नुकसान झाल्याने व्याजवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .
To Top