पुरंदर ! भावी पिढी निर्भर होण्यासाठी तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड आवश्यक : हभप काकामहाराज पहाणे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : वार्ताहर 
वारकरी संप्रदायाच्या कीर्तन,प्रवचन,जागर,हरिपाठ या माध्यमातून संतांचे सद्विचार समाजाला प्रबोधनकारक ठरतात.भावीपिढी संस्कारक्षम होण्यासाठी घराघरात शिक्षणाबरोबच भगवदगीतेचे पाठ दिले पहिजेत. भावी पिढी निर्भर होयासाठी संस्कृती,भक्ती,याच बरोबर तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची सांगाडा घालणे हि काळजी गरज आहे असे विचार पंढरपूर येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप काकामहाराज पहाणे यांनी व्यक्त केले. 
       पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी येथे सलग २४ व्या वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन संत सोपानकाका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अड त्रिगुणमहाराज गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंढरपूर येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप काकामहाराज पहाणे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले . संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम यांच्या अभंगाचे निरुपण करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 
          या महोत्सवात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रातील नितीन राउत, पशुवैद्यकीय अधिकारी पूनम जाधव- भोसले, बालकीर्तनकार राजश्री भोसले,सेना दलातील सचिन बाळासाहेब भोसले ,पोलीस पाटील स्वाती गणेश भोसले यांना यावेळी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आली. अखंड हरीनाम सप्ताह सेवा समितीचे अध्यक्ष संतोष भोसले ,व भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप संजयमहाराज भोसले यांनी केले तर आभार हभप जालिंदर भोसले यांनी मानले . फोटो इमेल केला आहे . 
To Top