सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : वार्ताहर
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र जेजुरी शहरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे त्या अनुषंगाने चारचाकी वाहनाची संख्या देखील वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी व शनिवार,रविवार व यात्रेच्या दिवशी जेजुरी शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होते.जेजुरीतून जाणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गावर व मोरगाव रोडवर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागत असतात. हो कोंडी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जेजुरी शहरातून बाह्यवळण रस्ता अथवा उड्डाण पूल व्हावा अशा आशयाचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना दिले
असल्याची माहिती जेजुरी पालिकेचे नगरसेवक जयदीप बारभाई यांनी दिली.
जेजुरी शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे या रस्त्यावरील व्यवसाय धंदे बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. रोजच होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडी मुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच भर म्हणून आळंदी पंढरपूर महामार्ग ( राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ ) जेजुरी शहरातून आत आहे. यामध्ये रस्त्याच्या दक्षिणेकडील एकाच बाजूने मोठ्या प्रमाणात जागा घेणार असल्याचे दर्शविले आहे. या अन्यायकारक सर्व्हेक्षणास नागरिकांनी विरोध केला असून महामार्गाच्या आराखड्यास रस्त्याच्या दक्षिणेकडील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत.सध्याची वाहतुकीची कोंडी व भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या यांचा विचार करता जेजुरी शहरासाठी बाह्यवळण रस्ता अथवा उड्डाणपूल होणे नितांत गरजेचे आहे.बाह्यवळण झाल्यास अवजड वाहने थेट शहरा बाहेर जातील ज्यांना देवदर्शनासाठी यायचे आहे तेवढीच वाहने जेजुरीत येतील .प्रस्तावित महामार्ग होत असताना जेजुरी शहरासाठी बाह्यवळण रस्ता अथवा उड्डाणपूल होणे व्हावा आशयाचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी सबंधित विभागाला दिले असल्याचे नगरसेवक जयदीप बारभाई यांनी संगितले.
नगरसेवक जयदीप बारभाई यांनी प्रस्तावित महामार्गामुळे नागरिकावर होणाऱ्या अन्याया बाबत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून चर्चा करून निवेदन दिले होते. या निवेदनानुसार खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना पत्र दिले आहे.