भोर ! राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का : राष्ट्रवादीच्या तीन दिग्गज नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या वर्षानुवर्षाच्या विकासकामांच्या धडाक्यामुळे तसेच पक्षाच्या कार्य पद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन दिग्गज नेत्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नक्कीच कमी झाली आहे
               राष्ट्रवादीचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कोंडे, जिल्हा परिषद माजी सभापती बाळकृष्ण दळवी तसेच अशोक शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये आमदार थोपटे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आमदार थोपटे पुढे म्हणाले काँग्रेस पक्षात येणाऱ्या नेत्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जातो.कोणाकडेही द्वेष भावनेने पाहिले जात नाही.सर्वांनाच समान वागनूक दिली जाते आणि दिली जाईल. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवने,अंकुश खंडाळे,कृष्णा शिनगारे,उत्तम थोपटे,के.डी. सोनवणे,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे,संपत दरेकर,सोमनाथ सोमाणी,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top