लोणंद पोलासांनी तलवार घेऊन फिरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या.

Pune Reporter

लोणंद २९

लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे रात्रीच्या सुमारास तलवार घेऊन फिरत असलेल्या युवकास लोणंद पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

तरडगाव ता. फलटण येथे फलटण लोणंद रोडवरील बसस्टॉप परिसरात नाकाबंदी करत असताना लोणंद पोलीसांनी एका शेवरलेट कंपनीच्या कारचा संशय आल्यानंतर घेतलेल्या झडतीत कारमधे घातक शस्त्र असलेली लोखंडी तलवार आढळून आल्यावर संबंधित कारमधील इसम गणेश विठ्ठल गायकवाड रा. तरडगाव वय ३० यास लोणंद पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर शस्त्र अधिनियमा प्रमाणे लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत सपोनि विशाल के. वायकर यांच्यासह पोलीस नाईक योगेश कुंभार, फय्याज शेख, शिवाजी सावंत यांनी भाग घेतला, या प्रकरणी पुढील तपास सपोनि विशाल के वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीनाथ कदम करत आहेत.
To Top