सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
सुपे विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बापू पांडुरंग चांदवडे व व्हाईस चेअरमनपदी उज्वला संजय खैरे यांची बिनविरोध निवड झाली.
सुपे विकास सेवा सहकारी संस्थेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे दोन पॅनल पडले होते त्यापैकी शेतकरी परिवर्तन विकास पॅनल ने १३ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले चेअरमन निवड बिनविरोध करण्यासाठी नितीन खैरे अतुल खैरे मनोज खैरे राजेंद्र खैरे व सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.