भोर ! रमजान ईद व अक्षयतृतीया उत्सवानिमित्त भोर शहरात पोलिसांचे पथसंचलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
रमजान ईद आणि अक्षयतृतीया या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भोर पोलिसांनी शुक्रवार दि- २९ शहरात पथसंचलन केले.पोलिसांनी भोर पोलीस ठाणे,सम्राट चौक,राजवाडा,बस स्थानक , बाजार पेठ ,नगरपालिका चौक मार्गे शिवाजी पुतळा चौक (चौपाटी) या मार्गावरून पथसंचलन केले.यावेळी सरकारी वाहनासह पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे ,उपनिरीक्षक बळीराम सांगळे ,पोलीस हवालदार उद्धव गायकवाड,दत्तात्रय खेंगरे,विकास लगस ,यशवंत शिंदे,विजय नवले आदिंसह १५ जवान उपस्थित होते.
To Top