सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
काटेवाडी : प्रतिनिधी
काटेवाडी (ता बारामती ) येथील वैकुंठ वाशी हभप एकनाथराव मारुतराव काटे देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चे औचित्य साधून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन काटेवाडी येथे करण्यात आले आहे .
बुधवार दिनांक १३ पासून अंखड हरिनाम सप्ताह किर्तन, प्रवचन अदि धार्मिक कार्यक्रम स सुरवात होणार आहे .
तुका म्हणे एका मरणे चि सरे ।
उत्तम चि उरे किर्ती मागे ।
या पंक्तीचा सारासार प्रमाणे ... वै . हभप काटे आण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि १३ एप्रिल बुधवार ते दि २० एप्रिल पर्यत किर्तनाच सोहळा काटेवाडी येथे साकारणार आहे .
दैनदिन कार्यक्रम खालील प्रमाणे
बुधवार 13 रोजी महादेव महाराज राऊत ( बीड ), गुरवार14 रोजी संजय नाना महाराज धोंडगे ( नाशिक ) शुकवार 15 रोजी पद्माकर महाराज देशमुख (अमरावती ) शनिवार दिनांक 16 रोजी युवक मित्र बंडातात्या महाराज कराडकर, रविवार 17 रोजी राम कृष्णदास महाराज लहुवितकर (नाशिक) सोमवार 18 रोजी वारकरी शिक्षण संस्था चे ज्ञानेश्वर महाराज शिंदे (आंळदी )मंगळवार 19 रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली आळंदीकर ) यांचे दररोज सायंकाळी सात ते नऊ कीर्तन निरूपम होणार आहेत
तसेच वै. हभप एकनाथराव (आण्णा ) काटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि २० रोजी हभप योगिराज महाराज गोसावी ( संत एकनाथ महाराज पैठण यांचे वंशज) यांचे सकाळी १0 ते १२ पर्यत फुलाचे किर्तन होणार आहे . दैनदिन ४ ते ५ वाजेपर्यत प्रवचन सेवा होणार आहे . रविवार दि १७ ते मंगळवार दि १९ / ४ / 22 पर्यत हभप जयंवत महाराज बोधले यांचे नारद भक्ती सुत्र या विषयावर दररोज दुपारी ३ ते ५ वाजे पर्यत प्रवचन होणार आहे या धार्मिक प्रवचन, किर्तन निरुपम श्रवण सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन राहूल एकनाथराव काटे, प्रंशात एकनाथराव काटे व भगिनी प्रतिभा रामेश्र्वर तांबे यांनी केले आहे . पहाटे काकडा सकाळी ज्ञानेश्र्वरी वाचन, सांयकाळी हरिपाठ, प्रवचन व ७ ते ९ किर्तन व रात्री हरिजागर कार्यक्रम होतील