सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
काटेवाडी - प्रतिनिधी
काटेवाडी (ता बारामती ) येथील काट्याचीवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील विठ्ठल काटे तर उपाध्यक्षपदी नितीन पांडुरंग माने यांची बिनविरोध निवड झाली
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी साठी सहाय्यक निबंधक कार्यालय येथे बैठक पार पडली या मध्ये अध्यक्ष पदासाठी स्वप्नील काटे तर उपाध्यक्ष पदासाठी नितीन माने यांचे दोन च अर्ज आल्याने अध्यक्ष पदी काटे तर उपाध्यक्ष पदी माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय आधिकारी तथा सहाय्यक निंबधक मिलिंद टांकसाळे यांनी जाहिर केले . या निवडी साठी सचिव बाळासाहेब जाधव यांनी सहकार्य केले . अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड जाहिर होताच फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला ..
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती हायटेक पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शना खाली संस्थेच्या पारदर्शक कारभार व सभासदाच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली