मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या बदनामीचे षडयंत्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुरंदर दि.११ (प्रतिनिधी) 
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांना धर्मदाय आयुक्त यांचेकडून मिळालेली जमिन विक्री केल्याच्या तथाकथित आरोपावरून सोशल मिडियावर संभाषण संवाद प्रसारीत केल्या प्रकरणी सोमवार (दि.११) रोजी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष राहुल शिंदे व पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी शैलेश पालकर (पोलादपूर जिल्हाध्यक्ष रायगड) व प्रशांत अष्टेकर (मुंबई) यांचे विरोधात भोर पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.
     याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांना मा.धर्मदाय आयुक्त यांनी रायगड जिल्ह्यात जमिन दिली व ती त्यांनी परस्पर विकून पैसे हडप केले, असे आरोप करणारे संभाषण शैलेश पालकर व प्रशांत अष्टेकर यांनी भ्रमणध्वनीवर केले व ती संभाषण ध्वनी राज्यातील अनेक ग्रुपवर प्रसारीत केली. वास्तविक मा.धर्मदाय आयुक्त यांनी अशाप्रकारे कुठलीच जमिन एस.एम.देशमुख यांना दिलेली नाही. त्यामुळे ती परस्पर विकण्यासाठी विषय नाही. असे असतांना केवळ एस.एम.देशमुख यांना अशा खोट्या आरोपावरून राज्यभर बदनाम करण्याचा प्रयत्न उपरोक्त “जोडगोळी”ने केला आहे.  
       एस.एम.देशमुख हे राज्यातील तमाम पत्रकार बांधवांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना बदनाम करुन मराठी पत्रकार परिषदेच्या हजारो सभासदांचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
     सोमवार (दि.११) रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांचे नेतृत्वाखाली पुणे जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे पुणे जिल्हा सोशल मीडिया चे उपाध्यक्ष राहुल शिंदे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी भोर पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.  
     दरम्यान, भोर पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील या निवेदनाची दखल पुढील दोन दिवसांत घेणार आहेत. 
     यावेळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, सचिव अमोल बनकर, खजिनदार निलेश भुजबळ, सहसचिव मंगेश गायकवाड,सुनिता कसबे, चंद्रकांत झगडे, निलेश जगताप, अमृत भांडवलकर, अक्षय कोलते, सचिन मोरे आदी पत्रकार उपस्थित होते.

To Top