सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
सूपे परीसरातील एक नामांकित असणारी बाबूर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून या संस्थेची आजपर्यंत कधीच निवडणूक झाली नसून आताची निवडणूक पण बिनविरोध पार पडली यंदा पहिल्यांदाच निवडणूक लागेल अस वातावरण निर्माण झाले होते परंतू विरोध गटाला एकास एक उमेदवार न मिळाल्याने शेवटच्या क्षणी ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पांडूरंग लडकत, जेष्ठ मार्गदर्शक हौशिराम पोमणे, साहेबराव पोमणे, राजकुमार लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले यामध्ये सर्वसाधारण जागेमधून शांताराम लक्ष्मण ढोपरे, गोरख कोंडीबा लव्हे, संतोष रामचंद्र पोमणे, सचिन सूरेश बाराते, उत्तम आबूराव लडकत, अंकुश दिनकर लडकत, निलेश भगवान लडकत, प्रकाश लोणकर,निलेश पोमणे तर महिला प्रतिनिधी मधून अनिता यशवंत लव्हे,सिंधूबाई रामचंद्र लव्हे तर एनटी मधून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले असून सदरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, दत्तात्रय ढोपरे, गोविंद भाचकर,आप्पा लव्हे, बापूराव पोमणे,अतूल लडकत नाना तूळशीराम लडकत, बाळासाहेब खोरे, हनूमंत गायकवाड, शिवाजी लव्हे गावच्या पोलिस पाटील सौ वनिता राजकुमार लव्हे तसेच सर्व सभासद बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले निवडणूक अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळे तसेच संस्थेचे सचिव संजय झगडे सह सचिव प्रमोद देव यांनी काम पाहिले