ज्युबिलंट कामगार युनियनच्या निवडणुकीत सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा दणदणीत विजय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जुबिलंट कामगार युनियनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये सतिश काकडे  यांचा नेतृत्वाखालील पॅनेलने  ७-० असा दणदणीत विजय मिळवला विरोधी पॅनेलला अवघ्या काही मतांवरच समाधान मानावे लागले. 
     नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ६३ कामगार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सतिश काकडे यांचा उमेदवारांना ५० ते ५९ अशा भरघोस मतांनी कामगारांनी निवडून दिले. 
या निवडणुकीमध्ये सतीश बाबुराव काकडे (५९ मते) सतीश मारुती काकडे (५७ मते) सुभाष खलाटे (५५ मते )  संजय सोनवणे (५२ मते) संभाजी निगडे (५१ मते) सुरेश कोरडे (५० मते) उत्तम गलांडे (५० मते) हे उमेदवार भरघोस मते मिळवीत विजयी झाले. विरोधी उमेदवार सुभाष जेधे यांना फक्त १६ मते मिळाली.
      विजयी उमेदवारांचे संघटनेचे अध्यक्ष सतिश काकडे तसेच जनरल सेक्रेटरी .सुनीलदत्त देशमुख खजिनदार .नंदकुमार निगडे व सोमेश्वरचे संचालक.अभिजित  काकडे, मदन काकडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
To Top