जावली ! प्रतापगड कारखान्याच्या अध्यक्षपदी सौरभ शिंदे तर उपाध्यक्षपदी अॅड.शिवाजीराव मर्ढेकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जावली : प्रतिनिधी 
जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी युवा नेतृत्व सौरभबाबा शिंदे यांची तर व्हाइसचेअरमनपदी ॲड.शिवाजीराव मर्ढेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
          कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली होती.या निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले होते.आज चेअरमन पदासाठी सौरभ राजेंद्र शिंदे व व्हा.चेअरमन पदासाठी ॲड.शिवाजीराव मर्ढेकर यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केले.
         आगामी गळीत हंगाम कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन सौरभ शिंदे यांनी यावेळी दिली.प्रतापगड कारखाना बंद असल्याने जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.सर्वसभासदांनी मोठ्या विश्वासाने जी जबाबदारी टाकली आहे.ती सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार असल्याचे सौरभ शिंदे यावेळी म्हणाले.
 व्हा.चेअरमन अॅड.शिवाजीराव मर्ढेकर म्हणाले, माजी आमदार आदरणीय लालसिंगराव शिंदे व दिवंगत चेअरमन राजेंद्र शिंदे यांना जशी साथ दिली.त्याच ताकदीने यापुढेही सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.कारखाना यावर्षी सुरू करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रु पुसने हेच प्रमुख उद्दीष्ट राहील. तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर चालू करण्यासाठी मी व माझे संचालक प्रयत्नशील राहू.सभासदांनी जो निवडणूक निकालातून आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो आम्ही नक्कीच सार्थ करून दाखावू असा विश्वास यावेळेस बोलताना सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
To Top