सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. १३ जागेसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संघाचे उपाध्यक्ष दिग्विजय जगताप यांच्या प्रयत्नातून ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
१४ मार्च ला अर्ज भरणे तर ६ एप्रिलला अर्ज माघारी घेणे तारीख होती. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिघांनी अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे - चंद्रशेखर सोमनाथ जगताप, राजेंद्रकुमार तुकाराम जगताप, विरेंद्र आप्पासाहेब जगताप, रणजित नारायण जगताप, अशोक दत्तात्रय जाधव, कुमार संपतराव जगताप, प्रविण मनोहर जगताप, हनुमंत मुगुटराव जगताप, सुनिता नानासो जगताप, विमल पोपटराव जेधे.रामदास बाबुराव चौगुले, भगवान बिरु कोकरे, दादा नामदेव जाधव