बारामती पश्चिम ! मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्रा. जवाहर चौधरी यांना पीएचडी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील भूगोल विषयाचे विभागप्रमुख प्रा. जवाहर लक्ष्मणराव चौधरी यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. 
           चौधरी यांनी भूगोल विषयात 'बारामती तालुक्यातील कृषीपूरक उद्योगांमुळे झालेल्या सामाजिक-आर्थिक विकासाचा भौगोलिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास' या विषयावर संशोधन करून विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे डॉ. पी. एच. म्हस्के व विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाचे डॉ. सुनिल ओगले यांनी त्यांना मार्गदर्शन केले.  चौधरी यांनी यापूर्वी अभ्यासक्रमाशी संबंधित सतरा पुस्तकांचे लेखन केलेले आहे. 34 वर्ष ते महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. तसेच यापूर्वी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग यांचा एक संशोधन प्रकल्पही पूर्ण केला आहे.
        महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव प्रा. जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे व प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.  
---
To Top