सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
जेजुरी औद्योगिक वसाहतीतील स्लीपशुअर या गाद्या व फोम उत्पादन करणाऱ्या कंपनीत शेड बांधण्याचे काम घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाने काम पूर्ण केले नाही. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करून सुमारे सात ते आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार उद्योजकाने दाखल केली. या तक्रारी नुसार जेजुरी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि जेजुरी औद्योगिक वसाहतीत पुणे येथील दिनकर रत्नाकर यांची स्लीपशुअर गाद्या ,फोम उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत सुमारे साडे सहा हजार स्केअर फुट शेडचे बांधकाम करण्याचे काम बांधकाम व्यावसायिक संजय दामोदर भालेराव रा.उरळी कांचन यांना देण्यात आले. या कामाची रक्कम १५ लाख ६० हजार रुपये ठरवून दीड महिन्यात काम पूर्ण करण्याचा करार झाला. सदर बांधकाम व्यावसायिकाने हे काम करताना सतत टाळाटाळ केली. काम निकृष्ट दर्जाचे केले, करारा नुसार काम पूर्ण केले नाही. सदर व्यावसायीकास १६ लाख ५० हजार रुपये देवूनही काम अपूर्ण राहिले आहे. या व्यावसायिकाने आपली सात ते आठ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार उद्योजक दिनकर रत्नाकर यांनी दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी सदर व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.