भोर : स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून उपविभागीय अधिकाऱ्यांची ताडी विक्रेत्यावर कारवाई : भोर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून अवैद्य ताडीची विक्री करणाऱ्यावर उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करत  ३८५ लीटर ताडी जप्त करुन  आरोपी  हनुमंत शिवय्या पामाले वय-६५  रा. नांदगाव भोर  याला ताब्यात घेतले. 
             याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सासवड उपविभागीय कार्यालयात भोर तालुक्यात अवैद्य ताडीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची खबर मिळाली असताना भोर पोलिसांना बाजूला ठेवून  उपविभागीय  पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातून कारवाई करण्यात आली असल्याची फिर्याद श्रीकांत अशोक वढणे वय ३६ वर्ष (सासवड कार्यालय) यांनी दिली. यामध्ये आरोपी हनुमंत शिवय्या पामाले ( वय ६५) ( रा. नांदगाव भोर ) असा  ११ प्लॉस्टीकच्या कॅन प्रत्येकी कॅन ३५ लिटरची  ताडी ३८५ लिटर प्रती लिटर किंमती ७० रूपया प्रमाणे एकुण कि.२६९५०/-रूपये व ११ कॅनची किंमत प्रत्येकी ५० रूपये एकुण ५५० रूपये असा  एकुण २७५००/-रूपयाचा ताडीचा माल  ताब्यात घेऊन जप्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत भोईटे ,  श्रीकांत अशोक वढणे , एस बी राऊत यांनी ही कारवाई केली.
To Top