बारामती ! बिबट्याच्या विश्रांतीनंतर बारामतीच्या पश्चिम भागातील मुरूममध्ये रानगव्यांचे दर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम(ता. बारामती) येथे सोमवारी(दि.४) रोजी रात्री साडेसातच्या दरम्यान ऊसाच्या शेतात चार रान गव्यांचे दर्शन झाल्याने प्रत्यक्ष पाहणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले. मंगळवारी(दि.५) रोजी सकाळी शेतात व आजूबाजूला पाहणी केली असता हे गवे मात्र स्थानिक शेतकऱ्यांना दिसले नाहीत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच सुपे परीसरात रानगवे दिसले होते. यानंतर पुन्हा मुरुम येथे रान गव्यांचे दर्शन झाले. वनविभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून हे प्राणी एकाठिकाणी थांबत नसल्याचे सांगितले. मुरुम येथील सिध्देश्वर कुंजीर व मयूर कुंजीर यांच्या निरा नदी शेजारी असलेल्या शेतात गव्यांचे दर्शन झाले. मंगळवारी सकाळी मात्र गवे शेतातून बाहेर पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेजारील निरा नदीतून ते पलीकडील खामगाव परीसरात गेले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शांत प्राणी असल्याने नागरीकांना मात्र त्याचा फारसा त्रास होत नाही मात्र उसासह अन्य शेतमालाचे नुकसान झाले आहे. 

To Top