सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेऊर रेल्वे गेट नजीक सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघालेल्या उसाने भरलेला ट्रक पलटी होऊन त्याखाली दबून एकाच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेऊर येथून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान जेऊर रेल्वे फटका नजीक आला असता ट्रकचे पाठीमागे उजव्या बाजूचे चाक तुटून बाहेर आले. ट्रक शेजारून जाणारी दुचाकीला चाक धडकले त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली त्याचबरोबर चाक तुटल्याने ऊसाने भरलेला ट्रक सुद्धा या दुचाकी वर पलटी झाला. आणि दुचाकीवरील दोघेही उसाच्या खाली आले. यामध्ये शिवाजी शिंदे( 54) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रावसाहेब शिंदे (वय 55 ) हे जखमी झाले आहेत.