नीरा बारामती रस्त्याचे होणार चौपदरीकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या 'या' सूचना

Pune Reporter

बारामती दि ५

पुरंदर आणि बारामती तालुक्याला जोडणारा निरा- बारामती या ४३ किलोमीटर अंतर असलेल्या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर व वाघळवाडी येथे झालेल्या सभेत दिल्याने या मार्गाला आता अच्छे दिन येणार आहेत. निरा येथून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरकडे जाते  तर बारामतीतून तुकाराम महाराजांची पालखी जाते या दोन्हीही पालखी महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.याशिवाय निरेतून संत सोपानदेव महाराज पालखीही निरा - बारामती मार्गे पंढरपूरकडे जाते. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला जोडणारा मार्ग असल्याने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकाऱ्याने चारपदरी करण्याचे सुचोवात अजित पवार यांनी दिले. तर रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने रस्त्याला लय चिटकायला जावू नका असा सल्लाही उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक रहिवाशांना दिला.

            बारामती तालुक्यातून जाणारे सर्वच मार्गांचे आता रुंदीकरण तर काही ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. मोरगाव रस्ता, फलटण रस्ता, इंदापूर रस्ता आदींचा त्यात समावेश आहे. याशिवाय संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे चौपदरीकरण होऊन स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मूल्यही मिळाले आहे. निरा रस्त्यावर वाहतुकीचा ताण सर्वाधिक आहे. याशिवाय याच मार्गावर सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाने असल्याने वाहनांची संख्या मोठी असल्याने अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या मार्गावरील झाडांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. रुंदीकरण झाल्यास या रस्त्यावरील शेकडो वर्षांची झाडे काढावी लागणार असून सुमारे ३३०० झाडांची कत्तल होणार आहे. या मार्गावर चिंच, वड, जांभूळ आदी झाडे मोठ्या प्रमाणावर असून रुंदीकरणात या झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरण प्रेमींची काळजी वाढली आहे. झाडांसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले उपमुख्यमंत्री यावर नक्कीच तोडगा काढतील अशी आशा तालुक्यातील जनतेला आहे. मार्गाचे भूसंपादन झाल्यानंतर नव्याने झाडे लावली जातील याशिवाय यातील काही झाडांचे प्रत्यारोपणही करता येणार आहे.

सोमेश्वर कारखाना परीसरात उसाच्या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर आदींची संख्या लक्षात घेता व वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी करंजेपुल ते वाणेवाडी असा दुसरा रस्ता तयार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून अधिकाऱ्यांना याबाबत माहिती व सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 




  माजी राज्यमंत्री शिवतारे यांनी पाठवले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र
ज्या पध्दतीने संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे कामे चालू आहेत   त्याच पध्दतीने संत सोपानकाका पालखी मार्गाचेही चौपदरीकरण व्हावे व सदरील रस्ता केंद्र सरकारच्या अतिरिक्त यावा याबाबतचे पत्र दिनांक २ एप्रिल रोजी राज्यमंत्री शिवतारे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविले आहे    

नीरा बारामतीचे रस्ता रुंदीकरण झाल्यास गावांना येणार महत्त्व  
 नीरा बारामती रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यालगत  असणार्या  गावाचे आता महत्त्व वाढणार असून नवीन उद्योग व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे  तसेच या रस्त्यालगत असणार्या जमिनीचे भाव गगनाला भिडणार आहेत . 
 



To Top