खंडाळा ! उसाच्या ट्राॅलीखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू : लोणंद-फलटण रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद फलटण रोडवर ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी होऊन दुचाकीवरील अल्पवयीन मुलगी ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. 
          लोणंद फलटण रस्त्यावरील सिद्धिविनायक गॅरेज च्या जवळ साखरवाडी कारखान्यात उस घेऊन जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक  एमएच ११ बीए ७७८३ या  ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्राॅलीला दुचाकीवरून ओव्हरटेक करणाऱ्या राहूल राजू कुसळकर याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एमएच ११ सीओ ८८०२ वरील अल्पवयीन मुलगी उडुन उसाने भरलेल्या ट्राॅलीखाली येऊन झालेल्या अपघातात सदर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक ३ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. सदर अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तिला तातडीने लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अति रक्तस्त्राव व दुखापत गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराठी बारामती येथे दाखल करण्यात आले होते. मात्र बारामती येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातातील मुलगी ही अल्पवयीन असून तिला राहूल राजू कुसळकर याने पळवून नेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असून  राहूल कुसळकर याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 
         सदर घटनेची  फिर्याद ट्रॅक्टर चालक रमेश शंकर आवारे वय ४२, रा पवारवाडी ता.फलटण याने लोणंद पोलिस ठाण्यात दिली असुन लोणंद पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
To Top