सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याच्या नवीन २५०० मे टनी नवीन प्रकल्पाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले आणि २४ तासांच्या आत या नवीन विस्तारीकरण प्रकल्पातून साखर बाहेर पडली.
या नवीन प्रकल्पातून बाहेर पडलेल्या नवीन साखरेच्या पोत्यांचे पूजन संचालक मंडळाच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक सुनील भगत, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, प्रवीण कांबळे, जितेंद्र निगडे, सचिव कालिदास निकम, डॉ मनोहर कदम यांच्यासह अधिकारी व कामगार उपस्थित होते. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी माहिती देताना सांगितले की, काल अजितदादांच्या हस्ते उदघाटन झाल्यावर आज सायंकाळी साडेसहा वाजता नवीन विस्तारीकरण प्रकल्पातून साखर बाहेर आली. या नवीन प्रकल्पातुन आतापर्यंत ३६०० क्विंटल साखर बाहेर आली आहे. नवीन प्रकल्पातुन हा प्रतिदिन १८०० में टनाने चालला आहे. यामध्ये अजून वाढ होऊन तो २२०० ते २५०० में टनापर्यंत चालेल असे सांगून यादव पुढे म्हणाले, सद्या सोमेश्वर कारखान्याने १० लाख ४३ हजार मे टन उसाचे गाळप केले असून सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रात अजून २ लाख ९० हजार टनाच्या आसपास ऊस शिल्लक आहे. यातील काही ऊस इतर कारखान्याना बाहेर जाण्याची शक्यता असून आपली गाळप क्षमता वाढली असल्यामुळे आपल्या कारखान्याची बाहेर गेलेली ऊसतोड वाहने परत बोलावली असल्याचे राजेंद्र यादव यांनी सांगितले.