सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील खानापूर ता.भोर येथील माहेरवाशिन आदर्श शिक्षिका व एकपात्री कलाकार भारती लक्ष्मण गायकवाड तथा भारत दीपक मोरे यांची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर १०६ देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर हॅलो सखी सह्याद्री कार्यक्रमात मी जिजाऊ,रमाई,सावित्री तसेच अहिल्याबाई होळकर बोलतेय या विषयावर मुलाखत झाल्याबद्दल खानापूर येथील ग्रामस्थ व सत्कार सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आमदार संग्राम थोपटे यांच्या सुविद्य पत्नी स्वरूपाताई थोपटे ह्या होत्या.यावेळी राजगडचे संचालक उत्तम थोपटे,सरपंच मंगल गायकवाड, उपसरपंच उज्वला पवार,माजी सरपंच चंद्रकांत नांगरे,सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र थोपटे,जयवंत कोंढाळकर,सुनील गायकवाड,जयवंत थोपटे,प्राध्यापक दीपक मोरे,पोलीस पाटील सौ.रवळेकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.