मनी, मसल, मीडिया आणि मार्केटिंग लोकशाहीस घातक : संजय आवटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळामध्ये सर्व सामान्य माणूस हा केंद्रबींदु आहे. सध्या राजकारणात मनी, मसल,  मिडीया, मार्केंटींग यांचा वापर केला जात असून लोकशाहीस हे घातक असल्याचे प्रतीपादन प्रसिद्ध लेखक व व्याख्याते संजय आवटे यांनी मोरगाव ता.  बारामती येथे केले . ते संस्कार  व्याख्यान मालेचे पहीले पुष्प गुंफताना बोलत होते .

संस्कृती युवा प्रतीष्ठानच्या वतीने  मोरगाव येथे संस्कार व्यख्यान मालेची सुरवात काल  दि २ रोजी झाली असून व्याख्यान मालेचे हे दहावे वर्ष आहे . या व्याख्यान मालेचे पहीले पुष्प महाराष्ट्राचे बदलते राजकारण या विषयावर  व्यख्याते , लेखक व दै. लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी गुंफले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  पीडीसी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे होते. तर कार्यक्रम प्रसंगी  माजी पंचायत समीती सदस्य दत्तात्रय ढोले, कृषी उत्पन्न बाजार समीती माजी सभापती दिलीप खैरे , शरद बारवकर , प्रतीष्ठानचे योगेश टकले , अजित गुंड , सुर्यकांत खैरे , गणेश कुंभार , विकास सणस , संदीप तावरे , केदार वाघ  आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
          पुढे बोलताना आवटे म्हणाले की , राजकारणाचा पट समजून घेतला की कालचे , आजचे व उद्याचे राजकारण समजते. सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची भुमीका तेवढीच महत्वाची  असते . सध्या  माध्यमांमध्ये सत्य मांडण्याची क्षमता संपली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . तसेच समाजसुधारक व विचारवंतांनी परखड भाषेत समाज प्रबोधन करुन सुद्धा आजही समाजातील जातीपातीवरुन राजकारण  सुरु आहे . काश्मीर फाइल सारखे मुस्लिम विरोधी सिनेमा बनविले जात आहेत . समाजातील जातीपातीचे  राजकारण अद्याप संपले नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा पोत बदलला पाहीजे असे मत त्यांनी व्यकत केले . प्रत्येक व्यक्तीने राजकारणासाठी  छत्रपती शिवाजी राजांना प्रेरणा स्तोत्र समजला पाहीजे. यानंतर नक्कीच राजकारण हे राजकारणासाठी होणार नाही . या कार्यक्रमाचे सुत्रेसंचालन गणेश कुंभार , प्रस्ताविक योगेश टकले तर शेवटी आभार  अजित गुंड यांनी मानले .
To Top