अरे बाबा ....! चॉपरच्या मागून कधी जायचं नसतं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे यांना वडीलकीचा सल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सभा उरकून दादांना इंदापूर गाठायचे होते. सोमेश्वर कारखान्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गाड्यांचा ताफा वांग वांग करत मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या ग्राउंडवर पोहचतात...तिथे हॅलिकॉप्टर उभेच होते. दादांसोबत अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत असतात. 
           दादा हॅलिकॉप्टर मध्ये बसतात. त्यानंतर सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे बसतात. त्यानंतर दादा म्हणतात प्रशांत कुठंय रे पलीकडून येऊन बस.....छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे पलीकडून बसण्यासाठी हेलिकॉप्टर च्या मागच्या बाजूने पलीकडे जायला निघतात..तेवढ्यात अजितदादा बोलतात..अरे चॉपरच्या मागून कधी जायचं नसतं.. पुढून जायचं असतं.. असा वडीलधारी सल्ला देखील छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे यांना दिला.
         
To Top