वडगाव निंबाळकर येथे पुणे जिल्हा बँकेसमोर पार्किंगची गैरसोय : खातेदारांना नाहक त्रास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव          
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे जवळपास शेजारील छोट्या गावातील सर्वच व्यवहार वडगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे होतात. चालू वर्ष सोसायटी वाटप सुरु झाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यावेळी वाड्या- वस्ती वरील अनेक खातेदार उपस्थित होते. यावेळी सर्वात मोठा प्रश्न होता तो पार्किंगचा यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेकांनी सावलीचा आश्रय घेत आपल्या गाड्या पार्किंग केल्या व काहीजणांनी आपल्या गाड्या रोडवरच पार्क कराव्या लागल्या,रोडवरची वाहतूक विस्कळीत झाली व नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या यावेळी अनेकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पार्किंगची व्यवस्था करावी, अशी आशा व्यक्त केली. लवकरात लवकर पार्किंगची व्यवस्था व्हावी व रस्त्यावरील गाडी पार्किंग चा मार्ग मोकळा करावा अशी आशा व्यक्त करीत अनेक खातेदारांनी मत व्यक्त केले .
To Top