सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या शेजारील खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील कुस्तीमध्ये अपघातग्रस्त झालेला पै.ओंकार प्रकाश मरगजे याच्या उपचारासाठी मातोश्री जनाबाई मरगजे यांच्याकडे ध्रुव प्रतिष्ठानच्या क्रीडा कोठयातून अध्यक्ष राजू केळकर यांनी १५ हजारांचा धनादेश दिला.
पै.ओंकार मरगजे मागील दोन दिवसांपूर्वी शेजारील गावच्या यात्रेच्या कुस्ती आखाड्यात कुस्ती खेळताना मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे.ओंकार याची घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून त्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्याने सद्या त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत.शक्य त्यांनी उपचारासाठी मदत करावी असेही आवाहन करण्यात यावेळी केळकर यांनी केले. याप्रसंगी पै.अभिजित मरगजे, प्रदीप वीर ,उपसरपंच कुणाल मरगजे, राहुल खोपडे, उपस्थित होते.
COMMENTS