ज्युबिलंट कामगार युनियन संघटनेच्या अध्यक्षपदी सतीश काकडे तर उपाध्यक्षपदी सुरेश कोरडे यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ज्युबिलंट कामगार युनियन च्या अध्यक्षपदी शेतकरी संघटनेचे नेते सतीश काकडे यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश कोरडे यांची बिनविरोध निवड पार पडली. 
         ज्युबिलंट कामगार युनियन मु. निबुत (निरा), ता. बारामती, जि. पुणे या संघटनेच्या संपूर्ण बारामती व पुरंदर तालूक्याचे लक्ष लागलेल्या त्रेवार्षीक निवडणुकीचा निकाल दि.६ एप्रिल रोजी जाहीर झाला. सदर संघटनेचा गैरमार्गाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी व्यक्तीकडुन झाला. तसेच अशा निवडणुका होऊ नयेत या करता  औद्योगिक न्यायालय पुणे येथे संघटनेच्या नावाचा गैरवापर करत तकार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्जात संघटनेच्या कार्यकारीणीने आमच्या कार्यकारणी ला सहभागी करून घेण्याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता.
        निवडणुकीवर स्थगिती मागणा-या अर्जावर सुनावणी होऊन त्या वर अंतीमतः निकाल जाहीर करे पर्यंत औद्योगिक न्यायालयाने निवडणुकांचा निकाल राखून ठेवण्याचे आदेश केलेले होते त्यामुळे या निवडणुकीकडे संपुर्ण बारामती व पुरंदर तालुक्याचे आणि औद्योगिक पट्टयातील कंपन्यांचे लक्ष लागले होते. दि. ४ एप्रिल रोजी आंतरीम अर्जावर आदेश करून औद्योगिक न्यायालयात निवडणुकांवर स्थगिती मागणारा रमेश जेधे, दिलीप अडसुळ, शिवाजी लोखंडे,  अनिल कोंडे यांचा अर्ज फेटाळून लावला. असा अर्ज फेटाळला गेल्याने संघटनेच्या निवडणुकीचे निकाल दि.०६.०४.२०२२ रोजी सांयकाळी जाहीर करण्यात आले. न्यायालयीन प्रकरणात युनियन 
 कार्यकारीणी तर्फे अॅड. गौरव सुधीर पोळ यांनी कामकाज पाहिले. 
      निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षपदी सतीश शिवाजीराव काकडे यांची निवड करण्यात आली असुन नुतन कार्यकारीणी पुढील प्रमाणे असेल
श्री सुरेश आनंदराव कोरडे - उपाध्यक्ष
श्री संजय पांडुरंग सोनवणे - जनरल सेक्रेटरी
श्री. सतीश बाबुराव काकडे - सह. जनरल सेक्रेटरी
श्री. उत्तम दिनकर गलांडे - खजिनदार
श्री. संभाजी बबनराव निगडे - सदस्य
श्री. सुभाष तात्यासाहेब खलाटे- सदस्य
श्री. सतीश मारूती काकडे - सदस्य
          कामगार वर्गातून व परिसरातून सर्वानी नवनिर्वाचीत कार्यकारीणीचे अभिनंदन केले.
To Top