भोर ! नेरे सोसायटीवर काँग्रेसचे वर्चस्व : अध्यक्षपदी दत्तात्रय सावले तर उपाध्यक्षपदी दशरथ सावले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिनेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर विविध कार्यकारी विकास सोसायटीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले असून चेअरमनपदी दत्तात्रय सावले तर व्हा. चेअरमनपदी दशरथ सावले यांची बहुमताने निवड झाली.
         सोसायटीच्या निवडीसाठी सुरवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील बैठकीमध्ये समजोता होईन संचालक बिनविरोध करण्यात आले.मात्र चेअरमन व व्हाईस चेअरमनच्या प्रतिष्ठेसाठी दोन्ही पक्षातून निवडनुक प्रक्रिया राबवण्यात आली.यात बहुमताने चेअरमन दत्तात्रय सावले तर व्हा.चेअरमानपदी दशरथ सावले यांची निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. ओव्हाळ यांनी काम पाहिले. संचालक म्हणून आनंदा बढे,शिवाजी मरगजे, शिवाजी पाटणे, अंकुश सावले, मधुकर कानडे, गोविंद सावले,हनुमंत कदम,जयश्री पवार,छाया पाटणे,दिलीप खळदकर यांची वर्णी लागली आहे.नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आमदार संग्राम थोपटे यांनी स्वागत केले.यावेळी प्रकाश मैद,शाम जेधे,मिलिंद म्हसवडे, शिवाजी बदक,संतोष म्हस्के,शाम चव्हाण,दिलीप पाटणे,विजय बढे,उपसरपंच राजेंद्र चिकने,चंदू सावले,काळूराम राऊत, उपस्थित होते.मागील पंचवार्षिकच्या कार्यकालातील चेअरमन मधुकर कानडे यांनी उत्कृष्ट काम करून सोसायटी सुस्थितीत ठेवण्यासाठी मोठे पर्यटन केले.

To Top